सर्व सामान्यांना होणार फायदा ; सोनं खरेदी-विक्रीकरण्याआधी हॉलमार्कचे नवे नियम जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जून । देशात आजपासून सोनं विक्री करताना गोल्ड हॉलमार्किंग म्हणजेच सोनं शुद्धता प्रमाणपत्र अनिवार्य असेल. आजपासून देशात त्याची अंमलबजावणी सुरू होईल. हॉलमार्किंगचा नियम सोन्याची विक्री करणा-यांसाठी लागू असेल. मात्र ग्राहक त्यांच्याकडे असलेलं सोनं हॉलमार्कशिवाय विकू शकतात. (India to enforce mandatory gold hallmarking from June 15: Here what buyers need to know)

केंद्र सरकारने एक वर्षापूर्वी याबाबत माहिती दिली होती. कोरोना महामारीमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. हॉलमार्किंग अनिवार्य असल्यामुळे सोने बाजारात काय बदल होणार हे जाणून घेऊया. तसेच हॉलमार्किंगसंबंधी जोडलेले सर्व नियम जाणून घ्या.

काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं की, भारतात स्वर्ण आभूषण सर्वोत्तम क्वालिटीचे असणे आवश्यक आहे. ग्राहकांना लवकरात लवकर हॉलमार्क प्रमाणित सोन्याचे दागिने उपलब्ध होणार आहे.

वर्तमानात हॉलमार्किंग केंद्र एका दिवसात 1500 दागिन्यांना हॉलमार्क करतात. या केंद्रांची दरवर्षी अनुमानित हॉलमार्किंग क्षमता 14 करोड आभूषण म्हणे दागिन्यांवर हॉलमार्क केले जातात. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या म्हणण्यानुसार, भारतात जवळपास 4 लाख ज्वेलर्स आहेत. यामध्ये 35879 बीएसआय सर्टिफाइड ज्वेलर्स आहेत.

या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल.

अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील. यामुळे ग्राहकांची फसवणूक न होता त्यांना शुद्ध सोने मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *