Bellbottom | ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘बेलबॉटम’ चित्रपट ; अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जून । बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. चाहत्यांना त्याच्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा असते. अशा परिस्थितीत, आता अक्षयच्या चाहत्यांसाठी एक मोठी चांगली बातमी समोर आली आहे. खिलाडी कुमारचे चाहते बर्‍याच दिवसांपासून अभिनेत्याच्या नवीन फिल्म ‘बेलबॉटम’ची प्रतीक्षा करत होते. ही प्रतीक्षा आता संपली आहे. अक्षयचा हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे (Akshay Kumar revealed his upcoming film bellbottom release date).

अक्षय हा पहिला असा अभिनेता आहे, ज्याचा ‘बेलब़ॉटम’ (Bellbottom) हा चित्रपट लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना त्याची एक झलक रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल. हा चित्रपट 27 जुलै 2021 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारने स्वत: चाहत्यांना माहिती दिली आहे की, त्याचा आगामी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल. अभिनेत्याने सांगितले की, ‘मला माहित आहे की, बेलबॉटमच्या प्रदर्शनासाठी तुम्ही खूप वात पाहत आहात. पण आता आम्हाला आमच्या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे…जगभरात प्रदर्शित होतोय 27 जुलैला…’

अक्षयच्या या घोषणेने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. बऱ्याच काळापासून अक्षयचा कोणताही चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालेला नाही. अशा परिस्थितीत, बेलबॉटम आता सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता अक्षयच्या चित्रपटाच्यानिमित्ताने चाहते थिएटरमध्ये येतील. या चित्रपटात अक्षय कुमार एका नव्या अवतारात दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *