मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य देव दिसणार शूरवीर बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जून । मराठीतील प्रसिद्ध अभिनेता(Marathi Actor) अजिंक्य देव (Ajinkya Dev) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतत आहेत. अजिंक्य देव पुन्हा एका ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहेत. अजिंक्य देव शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. स्टार प्रवाहवरील ‘जय भवानी जय शिवाजी’(Jay Bhavani Jay Shivaji) या मालिकेत ते बाजीप्रभू देशपांडे साकारताना दिसणार आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचा लढा तर आपण शालेय जीवनापासून शिकत आलोय. बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत अतुलनीय कामगिरी केली होती. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा आजही आदराने सांगितल्या जातात. बाजीप्रभूंचा पराक्रम जगायला मिळणार आहे प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य देव यांना

अजिंक्य देव यांनी ‘सर्जा’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. यामध्येसुद्धा त्यांनी एक ऐतिहासिक भूमिका साकारली होती. आत्ता थेट शूरवीर बाजीप्रभूंची भूमिका साकारायला मिळाल्यामुळे अजिंक्य देव खुपचं आनंदी आहेत. तसेच ही भूमिका म्हणजे आपल्यासाठी एक मोठं आवाहन असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे, या भूमिकेसाठी फिटनेसकड लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि मी माझ्या फिटनेसची उत्तम काळजी घेतो. एक्सरसाईज ते रनिंग या सर्व गोष्टी मी अगदी कसोशिने सांभाळतो. त्याचबरोबर मी खाण्यापिण्याचं देखील तारतम्य जपतो. त्यामुळे माझा फिटनेस अगदी व्यवस्तीत आहे’. तसेच या मालिकेसाठी त्यांनी खुपचं उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

स्टार प्रवाहवरील ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशनने केली आहे. येत्या 26 जुलैपासून ही मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांचा हा इतिहास आपल्या पर्यंत पोहचवताना आनंद आणि अभिमानसुद्धा होतं असल्याचं स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी म्हटलं आहे’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *