महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जून । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशन (CBSE)ने गुरुवारी 12 वीचा निकाल तयार करण्यासाठी ठरवलेल्या फॉर्मूल्यावर सर्वोच्च न्यायालयाला आपला रिपोर्ट सोपवला. बोर्डाने ठरवलेल्या क्रायटेरियानुसार यावर्षी 12 वीचा निकाल 30:30:40 च्या फॉर्मूल्यावर ठवरला जाईल.
मार्किंग स्कीम डिटेल्स देताना CBSE म्हणाले की, दहावी व अकरावीच्या 5 विषयांपैकी विद्यार्थ्यांनी ज्या तीन विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवले आहेत त्यांचा निकाल तयारीसाठी निवडला जाईल. त्याचबरोबर, ते बारावीच्या युनिट, टर्म आणि प्रॅक्टिकल परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केले जाईल.
सीबीएसईने बनवलेल्या पॅनेलने इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी 30:30:40 फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्याअंतर्गत दहावी-अकरावीच्या अंतिम निकालास 30 टक्के वेटेज दिले जातील तर 12 वीच्या पूर्व-बोर्ड परीक्षेला 40% वेटेज दिले जाईल. 4 जून रोजी सीबीएसईने 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्किंग स्कीम तयार करण्याचा निर्णय घेण्यासाठी 13 सदस्यांची समिती गठीत केली होती. या समितीला दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
बोर्डाकरुन असेसमेंट क्रायटेरिया ठरवल्यानंतरपासून विद्यार्थी संभ्रमात आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी त्यांच्या मार्कांचा अंदाज मंडळाच्या निर्धारित सूत्रानुसार स्वतःच काढू शकतात-
उदाहरणार्थ :-
क्लास नंबर (500 मधून)
10वी 285 (तीन विषयांचे 95-95)
11वी 470 (फायनल एग्जाम)
12वी 450 (प्री-बोर्ड)
आता 285 गुणांच्या 30%, 470 गुणांच्या 30% आणि 450 गुणांच्या 40% काढून आपले रिजल्ट स्वतः माहिती करुन घेऊ शकता. वरील अनुमानित गुणांच्या आधारे दहावीसाठी 85.5 गुण, 11 वीचे 141 आणि 12 वी पूर्व-बोर्डातील 180 गुण जोडले जातील. अशा प्रकारे विद्यार्थ्याला 500 पैकी एकूण 406.5 गुण मिळतील.
यानुसार त्याच्या 12 वीमध्ये 81% गुण येऊ शकता. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की, हा फक्त अंदाज आहे, निकाल असेच येतील असे आवश्यक नाही.
31 जुलैपर्यंत जारी होऊ शकतो निकाल
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बोर्डाने हे देखील सांगितले की, ठरवलेल्या क्रायटेरियाच्या आधारे जारी निकालाने असंतुष्ट विद्यार्थ्यांना जर परीक्षा द्यायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी नंतर वेगळी व्यवस्था केली जाईल. बोर्डाने हे देखील म्हटले आहे की, जर सर्व काही योग्य राहिले तर 31 जुलैपर्यंत रिजल्ट जारी केले जातील.