महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जून । छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्रत्येक प्रेक्षकांसाठी विशेष लोकप्रिय ठरलेलं आहे. मालिकेतील ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ (Gada Electronics) दुकान आता सगळ्यांनाच माहीत आहे. पण हे दुकान नक्की कोणाचं आहे हे माहीत आहे का? स्वतः दुकानाच्या मालकानेच या विषयी सांगितलं आहे.
मालिकेतल्या प्रसिद्ध गडा इलेक्ट्रॉनिक्सचं नावही गडा इलेक्ट्रॉनिक्सचं आहे. दरम्यान या दुकानाचे खरे मालक शेखर गडीयार हे आहेत. मुंबईतल्या खार भागात हे दुकान आहे. शेखर यांनी भाड्याने हे दुकान चित्रिकरणासाठी दिलेलं आहे. शेखर यांनी सांगितले की सुरुवातीला या दुकानाचं नाव शेखर इलेक्ट्रॉनिक्स होतं. पण मालिकेनंतर दुकान गडा इलेक्ट्रॉनिक्स म्हणून प्रसिद्ध झाल्याने गडा इलेक्ट्रॉनिक्सचं नाव ठेवलं.
मालिकेत जेठालाल (Jethalal Gada) हे गडा इलेक्ट्रॉनिक्स दुकान सांभाळतो. रोज सकाळी जेठालाल त्याच्या दुकानावर जाण्यासाठी निघतो. त्यामुळे दुकानाचा उल्लेख हा मालिकेत असतोच. त्यामुळेच हे दुकान मालिकेइतकच खऱ्या आयुष्यतही फार लोकप्रिय ठरलं आहे.
गडीयार पुढे म्हणाले कि सुरुवातीला त्यांना दुकान भाड्याने देण्याची फार भीती वाटत होती. शुटींग करताना दुकानाचं काही नुकसान तर होणार नाही ना अशी भीती वाटायची. पण अस कधीही घडलं नाही. खूप सतर्क राहून ते शुटींग करतात. मालिकेमुळे आता दुकानात ग्राहक कमी पर्यटक जास्त येतात. याशिवाय लोक फोटो घ्यायला विसरत नाहीत.गेली अनेक वर्षे सुरू असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका देशभरातच नव्हे अनेक ठिकाणी पाहिली जाते. मालिकेची प्रचंड लोकप्रियता आहे. 2008 साली मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. तर आजही मालिका सुरू आहे.