महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जून । इलेक्ट्रीक वाहन बनवणारी कंपनी एचओपी इलेक्ट्रीक मोबिलीटी यांनी नुकत्याच आपल्या दोन नव्या इलेक्ट्रीक दुचाकींचे लाँचिंग केले आहे. कंपनीने एलइओ व एलवायएफ या दोन नव्या स्कुटर्स दाखल केल्या असून त्यांच्या अनुक्रमे किंमती 72 हजार 500 रुपये, 65 हजार 500 रुपये इतक्या असणार आहेत. इंटरनेट, जीपीएस, मोबाइल ऍप अशा सुविधा यात असणार आहेत. एकदा चार्ज केल्यावर गाडी 100 कि. मी. चे अंतर पार करेल, असे कंपनीने सांगितले. या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत कंपनी आणखी 5 दुचाक्या दाखल करणार आहे.