महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २० जून – गेल्या आठवडाभरात सातत्याने घसरणाऱ्या सोन्या-चांदीच्या भावात शनिवारी बाजार बंद होताना कोणताही बदल झाला नाही. आज मुंबई आणि पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,220 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,220 रुपये इतका आहे. एक किलो चांदीसाठी आता 67,600 रुपये मोजावे लागणार आहेत. जागतिक स्तरावरील गुंतवणूक कमी झाल्याने सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत.
गेल्या आठवड्यात 14 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,760 रुपये इतका होता. तो आज, रविवारी 47,220 रुपये इतका झाला आहे. 14 जून रोजी एक किलो चांदीचा भाव हा 71,900 रुपये इतका होता, तो आता 67,600 रुपये इतका झाला आहे.
काही दिवसांपूर्वी सातत्याने वाढणाऱ्या सोन्या- चांदीचे भाव गेल्या आठवड्याभरात घसरले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर आलेल्या आर्थिक मंदीचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत घट झाल्याचं दिसून येतंय. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या दरात दीड हजारांची तर चांदीच्या दरात पाच हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचं सावट पसरले आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल काहीसा कमी झाल्याने सोन्याच्या मागणीत घट झाल्याचे दिसून येत आहे.