पिंपरी विधानसभा क्षेत्र संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २० जून – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (महाराष्ट्र शासन) अंतर्गत आज पिंपरी विधानसभा क्षेत्र संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठित करण्यात आली सदर समितीचे मार्गदर्शक आमदार अण्णा बनसोडे आहेत. तर अध्यक्ष श्री आनंद विष्णू बनसोडे आहेत. नियुक्ती झालेल्या सदस्यांना आमदार अण्णा बनसोडे व हवेली तहसीलदार सौ. राधिका बारटक्के यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी समिती मधील सदस्यांना आमदार अण्णा बनसोडे व तहसीलदार सौ. राधिका बारटक्के यांनी मार्गदर्शन केले.

या समितीमध्ये सौ.मेघा काळभोर, सौ. संगीता जोशी, श्री मोहिन मुजावर, श्री चंद्रकांत कांबळे, श्री कैलास कुदळे, श्री अब्दुल शेख. श्री गजानन मोरे. श्री श्याम मेवाती. आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *