अखेरच्या प्रवासात मिल्खा सिंह यांच्या हाती पत्नीचा फोटो, मन हेलावणारं दृश्य

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २० जून – भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग ( Milkha Singh)यांचे शुक्रवारी (18 जून) वयाच्या 91 व्या वर्षी कोरोनामुळे (Coronavirus) निधन झाले. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला कौर (Nirmal Kaur) यांचेही 5 दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर लगेचच मिल्खा यांचेही निधन झाले. शनिवारी मिल्खा यांना पंचतत्त्वात विलीन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हातात पत्नी निर्मल कौर यांचा फोटो होता. दरम्यान मिल्खा यांचा हा अखेरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वचजण या फोटोकडे पाहून भावूक झाले आहेत.

मिल्खा हे भारतीय सेनेतून निवृत्त अधिकारी असल्याने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्यांचा मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंगने त्यांना अग्नी दिला. दरम्यान यावेळी त्यांची पत्नी निर्मलाही त्यांच्यासोबत शेवटच्या प्रवासात सोबत असावी यासाठी त्यांचा फोटो मिल्खा यांच्यासोबत ठेवण्यात आला होता. (Great Indian Sprinter Milkha Singh Last Ride Towards Cemetery holding his Wife Nirmal Kaurs Photograph in Hand)

सेहवागने ट्विट करत व्यक्त केल्या भावना
मिल्खा सिंग यांच्या शेवटच्या प्रवासात सोबत पत्नीचा फोटो असल्याचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटून वीरेंद्र सेहगवागने देखील हा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर करत, ‘मिल्खा सिंग यांचे पत्नीच्या निधनानंतर पाच दिवसांतच निधन झाले, त्यांच्या शेवटच्या प्रवासात हातात पत्नीचा फोटो, ज्याच्यासोबत ते जग सोडून जात आहेत. हे दृश्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना खऱ्या प्रेमाची आठवण करु देईल.’

मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजरेला नजर खेळाच्या मैदानावरच झाली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्टी सुरु झाली. विशेष म्हणजे याआधी मिल्खा सिंग यांचे अनेक मुलींसोबतच्या प्रेमाच्या चर्चाही गाजल्या होत्या. मिल्खा सिंग यांचं नाव एक किंवा दोन नव्हे तर चांगल्या तीन मुलींसोबत जोडलं केलं आणि त्यांच्या प्रेमाचे किस्सेही चर्चिले गेले होते. मात्र, यापैकी कुणाशीही त्यांचं लग्न झालं नाही. कारण अॅथलेटिक्सच्या राजाचं मैदानावर हॉलीबॉलच्या राणीवर प्रेम जडलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *