Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
India vs New Zealand Final Live Cricket Score : पुन्हा पावसाची हजेरी ; चौथ्या दिवसाचा खेळ अजूनही सुरु झालेला नाही - Maharashtra 24

India vs New Zealand Final Live Cricket Score : पुन्हा पावसाची हजेरी ; चौथ्या दिवसाचा खेळ अजूनही सुरु झालेला नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ -ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २१ जून – जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम लढतीमधील पावसाचा व्यत्यय कायम आहे. आज (ता.२१) चौथ्या दिवसाचा खेळ अजूनही सुरु झालेला नाही. भारताला पहिल्या डावात न्यूझीलंडने २१७ धावांमध्ये गुंडाळले आहे. न्यूझीलंडने तिसरा दिवसाचा खेळ थांबला तेव्हा २ बाद १०१ अशी दमदार मजल मारली आहे.

भारताकडून अश्विन आणि इशांतने प्रत्येकी एक बळी मिळवला.चौथ्या दिवशी न्यूझीलंडला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल. न्यूझीलंड अजूनही ११६ धावांनी पिछाडीवर आहे.

तत्पूर्वी काल तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे (४९) आणि विराट कोहली (४४) यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर भारताला कशीबशी २०० पर्यंत मजल मारता आली. ठराविक अंतराने विकेट गमावल्याने भारताला अपेक्षित मजल मारता आली नाही. शेवटी भारताचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून जेमिसनने भारताच्या डावाला खिंडार पाडत ५ बळी टिपले. त्याला वॅगनर आणि बोल्टने प्रत्येकी दोन गडी बाद करत चांगली साथ दिली.

पावसाने पहिले सत्र वाया

न्यूझीलंडकडून केन विल्यम्सन आणि टेलर मैदानात

न्यूझीलंड ११६ धावांनी पिछाडीवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *