मनसेचं निवडणूक आयोगाला प्रत्युत्तर

Spread the love

महाराष्ट्र २४; मुंबई : मनसेच्या नव्या झेंड्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस बजावली आहे. पक्षाच्या झेंड्यावर महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस बजावली आहे. संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, जय हो फाऊंडेशन यांनी ही तक्रार केली होती. थोर व्यक्ती आणि चिन्हांचा गैरवापर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

पक्षाच्या झेंड्यावर शिवकालीन राजमुद्रेचा वापर केल्याप्रकरणी बुधवारी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) नोटीस बजावली. मनसेच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले होते. हा झेंडा भगव्या रंगाचा असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा आहे.

या निवडणूक आयोगाच्या नोटीसला मनसेने  प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या नोटीसविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचा झेंडा कुठला असावा याच्याशी राज्य निवडणूक आयोगाचा संबंध नाही. त्यामुळे आम्ही राज्य निवडणूक आयोगाला उत्तर देण्यास बांधील नाही, असा पवित्रा संदीप देशपांडे यांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *