अन्नधान्याच्या किमतीमुळे महागाईवाढ; औद्योगिक उत्पादन दर डिसेंबरमध्ये शून्यात

Spread the love

महाराष्ट्र २४-  दिल्ली : आधीच सुखावह नसलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे चक्र आणखी मंदावले आहे. वाढत्या अन्नधान्याच्या किमतीने महागाईत इंधन ओतले, तर औद्योगिक उत्पादन गेल्या डिसेंबरअखेर शून्यानजीक आले.जानेवारी २०२० मधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर थेट ७.५९ टक्क्यांवर झेपावला आहे. हा दर मे २०१४ नंतरच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील अशा ४ टक्के दराच्या जवळपास दुप्पट हा दर आहे.

निर्मिती क्षेत्राची घसरण कायम असून, डिसेंबर २०१९ मध्ये देशाचा औद्योगिक उत्पादन दर ०.३ टक्क्यांनी घटला.  महागाई दर डिसेंबर २०१९ मध्ये ७.३५ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी तो १.९७ टक्के होता.  वर्षभरापूर्वीच्या २.५ टक्के व आधीच्या महिन्यातील १.८ टक्क्याच्या तुलनेत यंदाचा औद्योगिक उत्पादन दर घसरती ऊर्जानिर्मिती, भांडवली वस्तुनिर्मितीमुळे शून्यानजीक रेंगाळला आहे. एप्रिल ते डिसेंबर दरम्यानही औद्योगिक उत्पादन दर ०.५ टक्केच राहिला आहे.

गॅस दरभडका,  दिल्लीतील निवडणुका संपताच घरगुती विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत सरकारने बुधवारी मोठी वाढ लागू केली. यानुसार १४.२ किलो वजनाच्या एका एलपीजी सिलिंडरमागे थेट १४४.५० रुपयांची वाढ होऊन त्याची किंमत ८५८.५० रुपये करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *