महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । दि. 24 जुन वार गुरुवार रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ओबीसी संघर्ष समीती व महात्मा फुले समता परिषद पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने “ओबीसी आरक्षण बचाव” संबंधित ” स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण ” अबाधित ठेवण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात शहरातील ओबीसी संघर्ष समीती व महात्मा फुले समता परिषद सहीत अनेक सामाजिक संघटणांनी सहभाग घेतला. त्याच प्रमाणे सर्व राजकीय पक्षातील ओबीसी नेते, आजी माजी नगरसेवक व ओबीसींचे हितचिंतक उपस्थित होते……व तदनंतर ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सरकारने कार्यवाही करावी म्हणून ” माननीय तहसीलदार… हवेली, पुणे ” यांना निवेदन देण्यात आले.