शेगावच्या कादंबरीची धमाल; सहा वर्षांची चिमुकली, 1.9 मिलियन फॉलोअर्स;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतात. प्रत्येकाला मुलांचा खोडकरपणा, त्यांचे लाडात बोलणे कदाचित या कारणांमुळे मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील एका छोट्या मुलीचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. कादंबरी ढमाळ असं या चिमुकलीचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे कादंबरीचे जवळपास 1.9 मिलियन फॉलोअर्स देखील आहेत.

बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव इथली सहा वर्षीय कादंबरी सध्या सीनियर केजीमध्ये शिकत आहे. दीड वर्षांपासून लॉकडाऊन असल्याने शाळा नावालाच. मग काय घरीच इन्स्टाग्रामवर श्रद्धा शिंदे यांचे व्हिडीओ बघितल्यानंतर कादंबरीला ते आवडले आणि तिने तिच्या वडिलांकडे श्रद्धा शिंदे यांच्यासारखे व्हिडीओ बनवण्याचा हट्ट केला. तेव्हापासून कादंबरीने व्हिडीओ बनवायला सुरुवात केली आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं वर्णन करणाऱ्या अभिनय संपन्न व्हिडीओमुळे परिसरात ती घराघरात पोहोचली. विशेष म्हणजे शिवमुद्रा तोंडपाठ असल्याने तिचं कौतुक होत आहे. नुकतंच अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कांदबरीने तयार केलेला व्हिडीओ चांगलाच गाजला आहे.

‘टिंडा’ या अॅपवर कादंबरीचे 1.9 मिलियन फॉलोअर्स तर इन्स्टाग्रामवर साडे चार हजार फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ज्या कादंबरीने अजून शाळेची पायरीही चढली नाही ती आताच सोशल मीडियात स्टार झाली आहे. कादंबरीच्या या कामगिरीवर देशभरातून विशेष म्हणजे नामवंत मराठी कलावंत, गायक, क्रिकेटपटू, समीक्षक आदींनी तिचे व्यक्तीशः कौतुक देखील केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *