Gold rate today : आजचा सोन्याचा भाव ; काय म्हणतायत तज्ज्ञ ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । आठवड्याच्या शेवटी स्थानिक मार्केटमध्ये सोन्याचे भाव जशास तसे आहेत. (Gold rate today) आज सकाळी ते 78 रुपयाच्या तेजीत सुरु झाले. सकाळी 11.15 वाजता, ऑगस्ट डिलिवरीवालं सोनं, 36 रुपये चढ्या भावासह, 46 हजार 906 रुपये प्रति दहा ग्राम असं ट्रेड करत होतं. तर ऑक्टोबरमध्ये ज्या सोन्याची डिलिवरी होणार आहे ते 22 रुपयांच्या तेजीसह 47 हजार 190 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत होतं. (Gold Price today) (What is the price of gold today, Will prices go up or down, What is an Expert)

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं तेजीतच आहे. (Gold rate international market) 2.45 डॉलरच्या तेजीसह 1779.10 डॉलर प्रती आऊंसच्या पातळीवर ते ट्रेड करत होतं. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही (Silver latest price) तेजी पहायला मिळते आहे. जुलै डिलिवरीवाली चांदी 267 रुपयाच्या तेजीसह 68 हजार रुपय प्रती किलोग्रामच्या स्तरावर ट्रेड करत होती. त्याचप्रमाणे सप्टेबर डिलिवरीवाली चांदी 284 रुपयाच्या तेजीसह 69 हजार 33 रुपये प्रती किलोग्रामच्या स्तरावर ट्रेड करत होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीला चमक आहे. चांदी 0.107 डॉलर तेजीसह 26.157 डॉलर प्रती आऊंसच्या स्तरावर ट्रेड करत होती.

IBJA च्या वेबसाईटवरच्या माहितीनुसार, 24 जूनला 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 47 हजार 216 रुपये प्रती दहा ग्राम एवढा होता. चांदीचा भाव 68 हजार 123 रुपये प्रती किलो एवढा होता. दिल्लीच्या बाजारात 24 जूनला सोन्याच्या दरात घट तर चांदीच्या भावात तेजी पहायला मिळाली. गुरुवारी सोनं 93 रुपयाच्या घटीसह प्रती 10 ग्राम 46 हजार 283 एवढं होतं. चांदीची किंमत 99 रुपयाच्या तेजीसह 66 हजार 789 रुपये प्रती किलोवर पोहोचली होती.

Prithvifinmart Commodity Research चे डायरेक्टर मनोजकुमार जैन यांचं म्हणणं आहे की, सोन्याच्या दरातली अस्थिरता कायम राहील. सोन्यासाठी 1764-1750 डॉलवर सपोर्ट आहे जेव्हा की रेसिसटंस 1788-1800 डॉलरच्या पातळीवर आहे. MCX वर सोन्याला सपोर्ट 46660-46500 चा स्तर आहे, तर रेसिस्टंस 47055-47280 च्या पातळीवर आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *