![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जून । कोरोनामुळे सराफ व्यापार बंद असल्यामुळे त्याचा परिणाम जागतिक स्तरावर झाला होता. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किरकोळ घट होताना दिसून येत आहे.
काल शुक्रवारी सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली तर चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर ६६ रुपयांनी घसरून प्रतिदहा ग्रॅम ४६,३०९ रुपयांवर बंद झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
मागच्या दोन दिवसांपासून सोन्याच्या भाव जैसे थे होता. तर काल सोन्याचा भाव ४६,३०९ रुपयांवर बंद झाला. चांदीच्या किंमतीत आज ३३२ रुपयांची वाढ झाली. आजच्या वाढीनंतर चांदीचा भाव ६७,२४८ रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. गुरुवारी तो प्रतिकिलो ६६९१६ रुपयांवर बंद झाला होता. डॉलरची वाढती किंमत तसेच इतर विविध जागतिक कारणांमुळे सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे.
