पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जून । पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक आले असून यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. जर आधारशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. केंद्र सरकारने आयकर कायदा 1961 कलम 234H मुळे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. 23 मार्च रोजी लोकसभेत हे वित्त विधेयक सरकारने मंजूर केलेले आहे.

आपण शासनाने दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत जर आपला आधार पॅनशी लिंक केले नाही तर यासाठी आपल्याला एक हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. तसेच एखाद्या व्यक्तीने शेवटच्या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी जोडले नाही, तर त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच लिंक न केल्यास 30 सप्टेंबरनंतर ते पॅन कार्ड आर्थिक व्यवहारात वापरले जाणार नाही. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल. म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट उघडणे, नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय आपण या सर्व गोष्टी करू शकणार नाही.

सर्व प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in म्हणजेच आता नवीन वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जा. खाली दिलेल्या लिंक आधारच्या पर्यायावर क्लिक करा. आपले स्टेटस पाहण्यासाठी Click here वर क्लिक करा. नवीन विंडोवर पॅन आणि आधार तपशील भरा. तिथे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही तपासा आणि नसेल तर लगेच लिंक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *