Petrol and Diesel Price : दरवाढीचा आज सलग 20 वा दिवस , आजची किंमत जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जून । राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किंमती 80 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात काल कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये किंचित वाढ झाली. दरवाढीचा आज सलग 20 वा दिवस आहे. आज डिझेल 17 पैशांनी महागले आहे तर, पेट्रोलच्या दरात 21 पैशांची वाढ झाली आहे. गेल्या 20 दिवसांत डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे 10.79 रुपयांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलही 8.87 रुपयांनी महागले आहे.

शुक्रवारी, 26 जून रोजी देखील सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवले. यापूर्वी 28 ऑक्टोबर 2018 रोजी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 80.05 रुपये होती तर त्यावेळी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 81 डॉलर इतकी होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात जरी कच्च्या तेलाचे दर गेल्या 20 दिवसांत कित्येक दिवस नरम राहिले, पण देशांतर्गत बाजारात त्याचे दर सतत वाढत आहेत. सध्या भारतीय बास्केट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 42 डॉलर इतकी आहे. त्या अनुषंगाने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले नाहीत. परिणामी, गेल्या 20 दिवसांत डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10.79 रुपयांनी वाढ झाली आहे. या दिवसात पेट्रोलच्या दरातही लिटरमागे 8.87 रुपयांची वाढ झाली आहे.

आपल्या शहरातील आजची किंमत जाणून घ्या
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. आपल्याला SMSद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील मिळू शकतात (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर माहिती मिळवू शकतात. त्याचवेळी, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPrice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *