T20 World Cup मधून कांगारूचे हे दिग्गज खेळाडू बाहेर होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जून । कोरोनामुळे टी 20 सामने भारतात नाही तर परदेशात होणार आहेत. या सामन्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. कांगारू संघातील तीन दिग्गज खेळाडू टी 20 सामने खेळणार की नाही याबाबत आता शंका उपस्थित करण्यात आली आहे. या संदर्भात कांगारूचा कर्णधार एरॉन फिंच याने खुलासा केला आहे.

आयपीएल खेळणाऱ्या 7 खेळाडूंवर टांगती तलवार आहे. यामध्ये डेविड वॉर्नर, पैट कमिंस, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोइनिस आणि डेनियल सॅम्स खेळाडूंचा सामावेश आहे. या खेळाडूंनी वेस्टइंडिज आणि बांग्लादेश दौऱ्यावर जाण्यासाठी नकार दिला. त्यांनी या दोन्ही दौऱ्यासाठी संघातून माघार घेतली. या खेळाडूंनी माघार घेण्याचं कारण म्हणजे या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डकडून त्यांना खेळण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. तर स्टिव स्मिथ जखमी असल्यानं तो खेळू शकणार नाही त्यामुळे त्याला आराम देण्यात आला आहे.

आगामी दौऱ्यातून माघार घेणाऱ्या खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारानं इशारा दिला आहे. फिंचच्या म्हणण्यानुसार जे खेळाडू वेस्टइंडिज आणि बांग्लादेश दौऱ्यातून माघार घेणार त्यांनी टी 20 वर्ल्डकपमधूनही बाहेर व्हावं लागेल असा इशारा दिला आहे. जे चांगलं खेळतील त्यांनाच टी 20 साठी संधी दिली जाणार असल्याचं फिंचने स्पष्ट केल्यामुळे आता कांगारू टीमचे खेळाडू काय भूमिका घेतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टी -20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून UAEमध्ये खेळवला जाणार आहे. T 20 वर्ल्ड कपचे सामने IPL फायनलच्या काही दिवसानंतर सुरू होईल. आयपीएलचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. सुपर 12 मध्ये एकूण 30 सामने खेळवले जाणार आहेत. 23 ऑक्टोबरपासून हे सामने सुरू होतील. यामध्ये 6-6 अशी दोन ग्रूपमध्ये विभागणी असेल. हे सामने दुबई, अबू धाबी आणि शारजाह इथे खेळवले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *