महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जून । महाराष्ट्र राज्य शासनाच्या ८ में २०२० रोजीच्या आदेशानुसार शाळांना इतर सुविधांसाठी चा खर्च किती कमी होतो त्याचा हिशेब पालक संघाच्या बैठकीत मांडून त्याप्रमाणे तो कमी करण्यासंबंधी निर्णय घ्यायचा होता. मात्र मागील संपूर्ण वर्षात बहुतेक शाळांनी एक तर पालक संघाची बैठक घेतलीच नाही किंवा घेतली असल्यास त्यात हिशेब मांडला नाही. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये शैक्षणिक शुल्क (ट्यूशन फ़ीस) वगळता तरीही कम्यूटर,लायब्ररी,स्पोर्ट्स,परीक्षा,एक्टिव्हिटी,लॅब, टर्म,सहल,कल्चरल प्रोग्राम, एन्युअल, इत्यादि फि वा खर्चाच्या नावाखाली कोट्यवधींचि फ़ीस पालकांकडून गोळा केली जी महाराष्ट्र राज्य शासनाच्या व माननीय न्यायपलिकांच्या आदेशाविरुद्ध असल्याने सदारिल एकूण गोळा केलेली फ़ीस पालकांच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या फि मधुन वजा करण्यात यावी, वा त्याचा परतावा करण्यात यावा अशी पिंपरी चिंचवड़ पालक संघाने मागणी केली आहे.
त्यासाठी पिंपरी चिंचवड़ पालक संघातर्फे अनेक शाळांनी मागील वर्षात गोळा केलेल्या फि च्या पावत्या व इतर पुराव्यानिशीचा अर्ज शिक्षण विभागास करण्यात आला असून सदारिल शाळांवर ताबडतोब कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच पालकांची शाळेबाबत काही तक्ररार असल्यास मेल करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड़ पालक संघटनेने केलेले आहे. Email – pcmcparents@gmail.com
राज्य शासनाच्या आणि न्यायपलिकेच्या निर्देशांना व आदेशांना झुगारून मागील २०२०-२१ च्या पूर्ण वर्षाची एकट्या पिंपरी चिंचवड मधील ठराविक शाळांमधून जवळपास ५० कोटिपेक्षा जास्तची फि, पालक संघाचा ठराव न करता इतर हेड खाली गोळा केली गेली आहे तिचा परतावा किंवा चालु वर्षाच्या फीमधुन कमी करुन घेण्याचे सर्वाधिकार प्रसाशनास आहे म्हणून प्रशासनाने कायद्याची अंमलबजावणी करावी. आम्ही काही शाळांचे पुरावे प्रशासनास सुपुर्द केले आहेत – पिंपरी चिंचवड़ पालक संघ