India vs England : भारतीय संघात मोठा बदल होणार; मधल्या फळीत पडणार एकाची विकेट ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जून । भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरू व्हायला आजपासून बरोबर ४० दिवसांचा कालावधी आहे. ट्रेंट ब्रिजवर ४ ऑगस्टपासून पहिल्या कसोटीला सुरूवात होईल. या मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी सराव सामन्यांच्या आयोजनासाठी बीसीसीआयनं इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाकडे ( ECB) विचारणा केली आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या या दोन सरावसामन्यांपैकी एक सामना हा इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध होण्याची शक्यता आहे.

पण, या ४० दिवसांत टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेल्या चुका सुधारण्याची आवश्यकता आले. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी सपशेल निराश केले. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियात बदल पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.

शुबमन गिलची मागील सात डावांतील कामगिरी ही ०, १४, ११, १५*,०, २८ व ८ अशी झाली आहे. चेतेश्वर पुजाराला ३५ डावांत एकही शतक झळकावता आलेले नाही. विराट कोहलीची २०२० व २०२१मधील कसोटीतील सरासरी ही अनुक्रमे १९.३३ व २८.६३ इतकी आहे. अजिंक्य रहाणेनं १२५ कसोटी डावांत ४१.१२च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. रिषभ पंतनं आक्रमक खेळ करून कसोटी क्रिकेटच्या प्रेमात सर्वांना पाडले असले, तर त्याच्या खेळात सातत्याचा अभाव आहे.

त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर खेळवायचे आणि लोकेश राहुल किंवा हनुमा विहारी यांचा मधल्या फळीत समावेश करून घेण्याचा विचार सुरू आहे. त्याचा फटका थेट पुजारा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुजारानं फलंदाजीचा अप्रोच बदलावा, हाच मॅसेज यातून द्यायचा आहे.

जसप्रीत बुमराह अजूनही सूर गवसण्याच्या शोधात आहे. त्याला त्याच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी आता पाच आठवड्यांचा कालावधी आहे. इशांत शर्माच्या बोटांना दुखापत झाली आहे, परंतु तो त्यातून सावरले. त्याच्या कसोटी कारकिर्दीला १४ वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता त्याला अन्य गोलंदाजांसाठी वाट मोकळी करून द्यावी लागेल. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीला तोड नाही. मोहम्मद सिराज व आवेश खान हे इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत प्लेईंग इलेव्हनमध्ये दिसतील. शार्दूल ठाकूरचा अष्टपैलू खेळाडू म्हणून वापर होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *