महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जून । आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमतींमध्ये तेजी दिसून येत आहे. त्याचा परिणाम लवकर भारतातील गॅस उत्पादनावर दिसून येणार आहे. . सरकार 1 ऑक्टोबर पासून घरघुती गॅसची नवीन किंमती जारी करणार आहे. यामध्ये थोडेथोडके नाही, तर 60 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
भारतात तेल आणि गॅस खनन क्षेत्रांमधील सर्वात मोठी सरकारी कंपनी ONGC चे म्हणणे आहे की, यावेळी नैसर्गिक गॅसच्या किंमतींमध्ये जवळपास 60 टक्क्यांपर्यंतची वाढ होऊ शकते. इंटरनॅशनल मार्केटमध्ये गॅसच्या वाढत्या किंमतींचा परिणाम कंपन्यांच्या महसूलावर दिसून येत आहे.
ONGC चे सीएमडी सुभाष कुमार यांनी कंपनीच्या वार्षिक आर्थिक निकालांची माहिती देताना म्हटले आहे की, जानेवारी-मार्च 2021 मध्ये कंपनीने 80 डॉलर प्रति बॅरल कच्च्या तेलाची विक्री केली आहे. कंपनीला 6 हजार कोटीहून अधिक नफा झाला आहे तर, या वर्षी कंपनी 29 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणार आहे.