सोन्याच्या किमतीत घसरण ; जाणून घ्या सोने आणि चांदीचा आजचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जून । सोन्याचा भाव ४६५०० रुपयांपर्यंत खाली गेला होता. तो सध्या ४७००० रुपयांच्या नजीक आहे. आठवडाभरात सोन्यामध्ये ७०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

यूएस फेडरल रिझर्वच्या बैठकीनंतर सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. अलीकडच्या आठवड्यांतील स्थिर सुधारणेनंतर यूएस अर्थ धोरणात बदलाच्या अपेक्षेमुळे सोन्याच्या किमतीवर गेल्या आठवड्यापासून दबाव निर्माण झाला आहे. सोने विक्रमी पातळीच्या तुलनेत ९००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव २००० रुपयांनी कमी झाला होता.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज रविवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६१६० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेटचा भाव ४७१६० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२६० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०३१० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४४६० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८५०० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९२२० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *