पावसाळ्यात साखर, मिठाला सुटलं पाणी ; या टीप्स करा फॉलो

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जून । पावसाळा सुरू (Rainy Season) झाला की अनेकदा दमट वातावरणामुळे (Humid Climate) पदार्थ खराब व्हायला लागतात. त्यामुळेच महिला उन्हाळ्यात वाळवण करून पदार्थ टिकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही असे पदार्थ असतात ज्यांना वाळवता येऊ शकत नाही. असे पदार्थ पावसाळ्यामध्ये टिकवणं कठीण (Difficult to Store) असतं. त्या पदार्थांमध्ये ओलावा (Moisture)तयार होत असल्यामुळे लवकर खराब होतात.

@ मीठ आणि साखर हे असे पदार्थ आहेत जे बदलत्या वातावरणामुळे लवकर खराब होतात. मात्र, रोजच्या स्वयंपाकात लागत असल्यामुळे हे पदार्थ टिकवणं कठीण बनतं. हे पदार्थ टिकवण्यासाठी काही छोट्याशा टीप्स वापरता येऊ शकतात.

@ पावसाळ्यात साखर प्लॅस्टिकच्या बरणीत किंवा स्टिलच्या भांड्यात ठेवत असाल तर पावसाळ्यामध्ये ही सवय बंद करून काचेच्या बरणीमध्ये साखर ठेवायला सुरुवात करा. शिवाय साखर काढताना नेहमीच सुकलेल्या हातांनी काढावी. आपल्या हाताचा दमटपणा साखरेला लागला तर साखर ओली होऊ शकते.

@ साखरेच्या डब्यामध्ये तांदळाचे काही दाणे टाकल्याने फायदा होतो. साखरेत किंवा मिठामध्ये तांदळाची पुरचूंडी टाकून त्यामध्ये ठेवून द्या. यामुळे त्यामध्ये तयार झालेला ओलावा शोषलं जाईल आणि साखर किंवा मिठाचा ओलेपणा लागणार नाही.

@ साखर किंवा मीठ जास्त दिवस टिकवण्यासाठी ब्लोटिंग पेपरही वापरता येतो. याकरता बरणीमध्ये साखर भरताना त्यामध्ये आधी ब्लोटिंग पेपर ठेवा त्यानंतर त्यावर साखर किंवा मीठ भरा. ब्लोटिंग पेपर त्यामधील ओलावा खेचून घेतं. एवढंच नाही तर बिस्कीट, कुकीज आणि चिप्स मऊ पडू नयेत म्हणून देखील तुम्ही ब्लोटिंग पेपरचा वापर करू शकता.

@ पावसाळ्यामध्ये साखरेमध्ये सात-आठ लवंग टाकून ठेवा. यामुळे साखरेला पावसाळ्यामध्ये ओलसरपणा लागणार नाही शिवाय साखरेमध्ये मुंग्या येणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *