Petrol Diesel : आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिलासा नाही , डिझेलची शंभरीकडे वाटचाल सुरु

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जून । देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती थांबायचं काही नाव घेत नाहीत. आज सलग दुसऱ्या दिवशी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचं दिसून आलं आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 34 पैशांनी वाढली आहे तर डिझेलची किंमत 26 पैशांनी वाढली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलचा दर हा 104.56 रुपये असून डिझेलचा दर हा 96.42 रुपये इतका आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 35 पैसे तर डिझेल 24 पैशांनी महाग झालं आहे.

गेल्या महिन्यात पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढायला सुरुवात झाली. 4 मेपासून आजपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 31 व्या वेळेस वाढ झाली आहे.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहर पेट्रोल डिझेल
मुंबई 104.56 96.42
दिल्ली 98.46 88.90
चेन्नई 99.49 93.46
कोलकाता 98.30 91.75

शहरांचा विचार करता, भोपाळमध्ये देशातील सर्वाधिक दराने पेट्रोलची विक्री होते. भोपाळमध्ये पेट्रोलचा दर हा 106.71 रुपये असून डिझेलचा दर हा 97.63 रुपये इतका आहे. महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र इंधनाच्या दरात वाढ होत आहे.

देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *