Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन ; डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करा - Maharashtra 24

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन ; डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जून । लसींची उपलब्धता निश्चित करून लसीकरणाची गती वाढवा. त्याचबरोबर डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशात लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मोदी यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोना टास्क फोर्स आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी, आरोग्य मंत्रालयतील अधिकारी यांच्यासह नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल उपस्थित होते. या आठवड्यात लसीकरण मोहीम गतीने राबविण्यात आली. त्याबद्दल समाधान व्यक्त करून मोदी म्हणाले, ही गती आणखी वाढवावी लागेल. शिवाय संक्रमण रोखण्याशिवाय नियमित चाचण्याही सुरूच ठेवाव्यात.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे कोरोना प्रतिबंधक 1.45 कोटी लसी उपलब्ध असून, आगामी तीन दिवसांत 19,10,650 लसी पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *