खंडाळा तालुक्यातील मानसी हाॅस्पीटलमधील डॉक्टर ढमाळ दांपत्य पैलवानांच्या मदतीसाठी सरसावले

Spread the love

कुस्तीप्रेमी डॉक्टर दांपत्याची कुस्तीगिरांना आर्थिक मदत

महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या रक्तात कुस्ती व कुस्ती प्रेम असल्याचे येतोय प्रत्यय

महाराष्ट्र 24 । सातारा । विशेष प्रतिनिधी ।

सलमान खानचा सुलतान आणि आमिर खानचा दंगल या सिनेमांमुळे महाराष्ट्र-भारतातल्या कुस्तीपटू आणि आखाड्यांना चांगले दिवस आले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जगभर सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रावर संकट कोसळले आहे. कुस्ती हा लाल मातीतील खेळही याला अपवाद नाही. गावोगावी असलेल्या तालमी, कुस्ती मैदाने बंद पडली. परिणामी कुस्तीगिरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. एकूणच कुस्ती क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. असे असताना सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथील मानसी हाॅस्पीटलमधील डॉक्टर ढमाळ दांपत्याने मराठी माणसाच्या नसानसात भिनलेली लाल मातीतील कुस्तीला जीवंत ठेवणाऱ्या पैलवांना अर्थात कुस्तीगिरांना आर्थिक मदत करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. यामुळे ढमाळ दांपत्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, कुस्तीपटूंनी त्यांचे आभार मानले आहेत.

कोरोनो महामारीच्या काळात सगळ काही बंद झाले त्यातुन कुस्ती क्षेत्र सुध्दा सुटले नाही. गावोगावी होणारी कुस्ती मैदाने बंद झाली. तालीमी बंद पडल्या कुस्ती क्षेत्राच खुप मोठ नुकसान झाले. गावोगावच्या कुस्ती मैदानात कुस्त्या करून मिळालेल्या बक्षीसातून आपल्या खुराकाचा खर्च भागवणाऱ्या काही पैलवानांनावर अक्षरशः पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी सुध्दा करावी लागली. अशा बातम्या कुस्ती मल्लविद्या या पैलवानांच्या हितासाठी धडपडणाऱ्या महासंघाचे फेसबुक पेजवर वर धडकू लागल्या. त्यामुळे पैलवान मंडळीना दानशूर मंडळीकडून मदतीचा ओघ सुरू झाला.

त्यातच मानसी हाॅस्पीटलमधील डॉक्टर दांपत्य ढमाळ यांनी कुस्ती आणि पैलवानांनावर ओढवलेल्या संकटावर मात करण्यासाठी २१०००/रूचा धनादेश सातारा जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघाचे अध्यक्ष पै. अमर साबळे यांच्याकडे सुपूर्द केला. याच मदतीतून लोणंद येथील लाल माती कुस्ती केंद्र व जय हनुमान कुस्ती केंद्र वाखरी येथील सराव करणाऱ्या मल्लांना तुप, बदाम व सुका मेवा यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अमर साबळे यांनी लाईव्ह महाराष्ट्र 24 ला दिली.
तर कुस्ती या खेळावर प्रेम व निष्ठा असलेल्या डॉ. ढमाळ दांपत्याने भविष्यात कोणत्याही पैलवानास सरावादरम्यान किंवा मैदानी कुस्तीत काही इजा झाल्यास निशुल्क इलाज केला जाईल, अशी ग्वाही दिली.

————————————————————————

लाल मातीतील कुस्तीगिरांना विविध प्रकारे मदत करून कुस्ती हा खेळ जीवंत रहावा. यासाठी समाजातील प्रत्येकाने सढळ हाताने मदत करत औदार्य दाखवावे. ज्याद्वारे पैलवानांना मदत होईल. दानशूर लोकांना नम्र आवाहन पैलवांना फुल ना फुलाची पाखळी म्हणून मदत करा.
– पै. अमर साबळे,
सातारा जिल्हा अध्यक्ष, कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *