Horoscope : हर हर महादेव ; या राशींच्या व्यक्तींना आजचा दिवस शुभ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जून ।

मेष : आज एखाद महत्वाचे कार्य पूर्ण करू शकता. भाग्य तुमच्यासोबत आहे. कुटुंबाकडून आज प्रसन्नता अनुभवता येणार आहे. आरोग्य ठीक राहिल.

वृषभ : आज तुमची प्रतिभा आज तुमच्या भाग्याला कारणीभूत आहे. सगळ्या कार्यात यश मिळणार आहे. नोकरी व्यवसायात पाहायला मिळेल.

मिथुन : आज सगळ्यांसोबत चांगला व्यवहार असेल. धनलाभ होण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. पॉलिसी शेअर मार्केटयामध्ये गुंतवणूक करू शकाल. तुमचं स्वास्थ उत्तम राहिल.

कर्क : आज अनेक लोकांसोबत चर्चा करता येईल. अनेकांशी चांगले संबंध राहतील. कामाच्या ठिकाणी थोडा त्रास सहन करावाला लागेल. आरोग्य चांगले राहील

सिंह : आज नोकरीत चांगला मान आणि प्रतिष्ठा मिळेल. प्रमोशनकरता आजचा दिवस महत्वाचा ठरेल. दिवसाची सुरूवात चांगल्या गोष्टीने होईल.

कन्या : आज गरजेपेक्षा अधिक राग तुम्हाला त्रास देईल. अपत्याचं सुख महत्वाचं असेल. परमेश्वराचं स्मरण अतिशय महत्वाचं आहे. आरोग्य चांगले राहील

तुळ- आज चातुर्याने काम करा, यश नक्की मिळेल. प्रमाणापेक्षा जास्त राग आडचणी वाढवेल. कोणतही काम करण्यापूर्वी वरिष्ठाचा सल्ला नक्की घ्या.

वृश्चिक- आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा. मुले खेळ आणि इतर मैदानी कामांवर जास्त वेळ देतील.

धनु- आज स्वतःवर विश्वास ठेवा. अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस चांगला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. दिवस चांगला आहे.

मकर- आज कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. दिवस लवकरच बदलतील. चांगल्या व्यक्तींसोबत भेटी होतील. भविष्याकडे वाटचाल करा. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ- आज सर्वत्र तुमची चर्चा असेल. अधिक प्रगती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल. वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल.

मीन- आज अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कार्यक्षेत्रात थोडी चूक झाल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *