देहू आणि आसपासच्या 6 गावांमध्ये 28 जून ते 4 जुलैपर्यंत संचारबंदी लागू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जून । अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा अर्थात आषाढी वारी सोहळा येत्या 1 जुलैला जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाने सुरू होतोय…! पण यंदा ही कोरोनामुळे हा सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित होणार आहे. भागवतांच्या संभाव्य गर्दीमुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालायकडून देहू आणि आळंदीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीये.

त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी 28 जून ते 4 जुलै पर्यंत देहू आणि आसपासच्या 6 गावांमध्ये संचारबंदी लागू केलीये. त्यात स्थानिक देहूकरांना ओळखपत्र दाखवूनच गावात प्रवेश देण्यात येणार आहे. देहूरोड पोलिसांकडून याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. बॅरिकेट्स लावून पोलिसांनी मंदिर परिसर बंद केला आहे, त्यामुळे संपूर्ण देहूनगरीला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय.

कोरोनाच्या वाढता प्रसार पाहता गर्दी टाळण्यासाठी जमेल तितके कठोर निर्बंध स्थानिक प्रशासनाकडून लावण्यात येत असल्याचं दिसून येतंय. सरकारने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन केलं जावं याची स्थानिक पातळीवर देखील खबरदारी घेतली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता डेल्टा (Delta variant of Coronavirus) आणि डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने (Delta Plus variant of Coronavirus) सर्वांची चिंता वाढवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *