महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जून । कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु डेल्टा प्लस विषाणूमुळे उद्योगावर परिणाम होणार नाहीत. असे स्पष्टीकरण सुभाष देसाई यांनी केले .
उद्योग क्षेत्रात नव्याने लॉक डाऊन लागणार नाही . यापूर्वी दिलेल्या सूचनांचे उद्योजकांनी पालन करावे , कामगारांचे पूर्ण लसीकरण करून घ्यावे उद्योगावर कुठलेही निर्बंध लागणार नाहीत ,