महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जून । शरीरात हिमोग्लोबिन (haemoglobin) कमी झाल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास व्हायला लागतात. थकवा येणं, श्वासोच्छवासाला त्रास होणं, अशक्तपणा (Weakness) असे त्रास व्हायला लागतात. महिलांच्या शरीरामध्ये 12 ते 16 मिलिग्रॅम हिमोग्लोबिन तर, पुरुषांच्या शरीरात 14 ते 18 मिलीग्राम हिमोग्लोबिन असावं लागतं. हिमोग्लोबिन शरीरामध्ये कमी झालं तर, काही पदार्थ खाऊन आपण हिमोग्लोबिन वाढवू शकतो.
डाळिंब ; शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर ते वाढवण्यासाठी डाळिंब हा एक चांगला पर्याय आहे. डाळिंबामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमीन असतं त्यामुळे हिमोग्लोबिन लेव्हल वाढते.
बीट; बीट हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमीन ए आणि व्हिटॅमीन सी याशिवाय फॉलिक ऍसिड,फायबर, मॅगनीज, पोटॅशियम देखील मोठ्या प्रमाणात असतं.
टोमॅटो ; टोमॅटो खाण्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होऊ शकते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमीन ई, थियामिन, निआचिन, व्हिटॅमीन बी6, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर यासारखे पोषक घटक असतात. याबरोबरच फायबर व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन के पोटॅशियम आणि मॅग्निज असतं.
खजूर ; शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाला असेल तर, खजूर खायला सुरुवात करा. खजुरामध्ये कॉपर,मॅग्नेशिअम,मॅगनीज, व्हिटॅमीन बी6 पॅन्टोथेनिक ऍसिड आणि रिबोफ्लॅविन सारखे पोषक घटक असतात.
अक्रोड ; अक्रोड खाल्ल्यामुळे देखील शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता दूर होऊ शकते. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं. याबरोबरच कॅल्शियम, मॅग्नेशियम,फायबर आणि व्हिटॅमीन बी देखील असतं.
पालक ; पालका सारखी पाले भाजी खाल्ल्यामुळे देखील हिमोग्लोबिन वाढतं. पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
अंजीर ; अंजीर सारख्या सुकामेव्यामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्याची क्षमता असते. त्यामुळे अंजीर नेहमी खावेत. अंजिरा मध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी1, व्हिटॅमीन 2, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, मॅग्नीज, सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन असतं. यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
( टीप ; ही सामान्य माहिती आहे कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या )