महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जून । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वर जाण्याची मालिका अद्यापही सुरुच आहे. मंगळवारी इंधनाच्या दरात जून महिन्यातील 16 वी दर वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे पेट्रोलचे दर 34 पैशांनी तर डिझेल 30 पैशांनी महागले. इंधन दरवाढीचा वणवा आता देशभरात पसरला आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलने (Petrol) शंभरी ओलांडली आहे. तर डिझेलही त्याच मार्गावर वाटचाल करत आहे. (Petrol and diesel prices in Maharashtra)
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली होती. गेल्या 33 दिवसांत पेट्रोल तब्बल 8.40 आणि डिझेल 8.47 रुपयांनी महागले आहे. पेट्रोलने शंभरी गाठलेल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नईचा समावेश आहे.
महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?
मुंबई: पेट्रोल- 104.90, डिझेल 96.72
पुणे: पेट्रोल- 104.48, डिझेल 94.83
नाशिक: पेट्रोल- 105.24, डिझेल 95.56
औरंगाबाद: पेट्रोल- 106.14, डिझेल 97.96
कोल्हापूर: पेट्रोल- 105.00, डिझेल 95.35