आता दूध महागले, नवीन दर आजपासून लागू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १जुलै । Amul price Hike:अमूलने (Amul) दुधाच्या दरात वाढ घोषित केली आहे. १ जुलैपासून अमूल दूध देशभरात दोन रुपयांनी महाग झाले आहे. गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यांत नवीन दर लागू करण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांच्या किंमती वाढवल्यानंतर अमूलने आता दुधाच्या किंमती वाढविल्या आहेत. आता सर्वसामान्यांना दुधासाठीही जास्त खर्च करावा लागणार आहे.

गुजरात मिल्क को-कोपरेटिव मार्केटिंग लिमिटेड (GCMMF)अमूलचे एमडी डॉ. आरएस सोधी म्हणाले की इनपुट आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे हे पाऊल उचलले गेले आहे. देशात अमूल दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आता अहमदाबादमध्ये अर्ध्या लिटर अमूल गोल्डची किंमत 30 रुपये आहे, अर्धा लिटर अमूल ताझा 24 रुपये असेल.

वाढत्या इनपुट कॉस्टमुळे अमूल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या सर्व ब्रँडमध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. आजच्या वाढीमुळे आता अमूल गोल्डचे दर 58 रुपये प्रति लिटरपर्यंत गेले आहेत. याशिवाय अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी स्पेशल, अमूल स्लिम एन्ड ट्रीम दूध यामध्ये दोन रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *