सलाम तुमच्या कार्याला ; नॅशनल डॉक्टर डे निमित्त आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून डॉक्टरांचा सन्मान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । पिंपरी चिंचवड । विशेष प्रतिनिधी । दि. १ जुलै । भारताचे प्रसिद्ध डॉ. बिधान चंद्र रॉय (Dr. B.C.Roy ) यांच्या सन्मानार्थ आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांची जयंती आणि पुण्यतिथी म्हणजेच १ जुलै रोजी नॅशनल डॉक्टर डे साजरा केला जातो . गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना वायरस संकटामुळे डॉक्टर दिन साजरा करण्याला आणखीनच महत्व आले आहे . डॉक्टर डे निमित्त आमदार बनसोडे यांनी शहरातील डॉक्टरांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला . यावेळी डॉ. अभय तांबिले , डॉ . सत्यजित पाटील , डॉ . निलेश लोंढे , डॉ . सुनील पाटील , डॉ .प्रशांत पाटोळे , डॉ .पवन धारोरकर ,डॉ .प्रशांत बंब डॉ .दत्तात्रय कोकाटे ,डॉ .सुहास जाधव , डॉ .नंदकुमार माळशिरसकर , डॉ .जबीन पठाण ,डॉ .नूतन वाघ , डॉ . सोनाली काटे , डॉ .अमित वाघ. यांना सन्मानित करण्यात आले .

यावेळी बोलताना आमदार बनसोडे म्हणाले की , गेल्या दीड वर्षापासून पिंपरी चिंचवड पुणे तसेच राज्यात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. ‘कोरोना लढय़ा’त डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रंटलाइन कर्मचारी, पत्रकार यांच्यासह अनेक ‘कोरोना योद्धय़ां’नी आपल्या जिवाची बाजी लावली आहे. त्यामुळे कोरोनाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने आणि खबरदारीनेच वागले पाहिजे, शिवाय जी मिळेल ती लस घेतली पाहिजे. याशिवाय सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात धुणे या बेसिक गोष्टी प्रत्येकाने आतादेखील पाळल्या पाहिजेत. कोरोना व्हायरस आता आपला ‘स्ट्रेन’ बदलत असल्याचे समोर आल्यामुळे खबरदारी जास्त घ्यावी लागेल. निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे बेजबाबदारपणे गर्दी न करता खबरदारी घेतली पाहिजे. कठोर नियम, सर्वांसाठी लोकल निर्बंध हे निर्णय जनतेच्या भल्यासाठीच आहेत, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे, कोरोनाच्या दोन्ही लाटांवर पिंपरी चिंचवड ने यशस्वीरीत्या मात केली आहे. आता रुग्णसंख्या नियंत्रणातही आहे. त्यामुळे तिसरी लाट येऊच नये अशी अपेक्षा आहे.

कोरोना वायरस संकटामध्ये कोरोना युद्ध म्हणून आपल्या घरापासून लांब राहून जीवाची पर्वा न करता तुम्ही डॉक्टर मंडळी अहोरात्र काम करत आहात . आपल्या कामाप्रती निष्ठा, मानवता , बंधुता व सार्वजनिक आरोग्य या भावनेतून सर्व मानवाची आपण सेवा करीत आहात ,म्हणून म्हणतो देवा सारखे येती धावून, देवा सारखे करतात काम , माणसातल्या या देवाला सदैव आमचा सलाम या शब्दात आमदार बनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *