दिलासादायक न्यूज; सोयाबीन, सूर्यफूल तेलाच्या दरात घसरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जुलै । एकीकडे कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या (Job) गेल्या. बेरोजगारी (Unemployment) वाढली. दुसरीकडे महागाई वाढत आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनमानावर होत आहे. खाद्यतेलाच्या किमतीतही महामारीत वाढ झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर तीन महिन्यांपासून २०० ते २१० रुपये किलो आहेत, तर सूर्यफूल व सोयाबीनच्या दरात २० ते २२ रुपयांची घसरण झाली आहे. (ladies good news edible oil price is low)

गेल्या वर्षी मार्चपूर्वी ९० रुपयांवर प्रतिकिलो असलेले सोयाबीन तेल सध्या १४२ वर येऊन ठेपले आहे. मध्यंतरी याचा सर्वाधिक दर १६६ रुपयांवर पोचला होता. नंतर १३५ वर आला. सध्या १४२ रुपये सुरू आहे. शेंगदाणा तेल गतवर्षी १०५ ते ११० रुपयांवर होते. ते वर्षभरात १८०-१८५ प्रतिकिलोपर्यंत पोचले आहे. तब्बल ७५ रुपयांची वाढ वर्षभरात झाली. खाद्यतेल म्हणून सूर्यफुलाचाही वापर अधिक होतो. १८५ रुपयांवर याचा दर गेला होता. तो कमी होऊन आता १६५ रुपयापर्यंत आला आहे.

करडईचे तेलही वापरले जाते. मात्र, जिल्ह्यात करडईचे उत्पन्न अनेक वर्षांपासून शेतकरी घेत नाहीत. यामुळे करडई तेल उपलब्ध नसते. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र हे तेल अधिक विकले जाते.

पामतेल दहा ते १५ वर्षांपूर्वी रेशन दुकानांवर मिळत असे. अतिशय कमी किमतात ते उपलब्ध होत. आता रेशन दुकानांवर हे तेल मिळत नाही. मात्र, अनेक हॉटेलचालक पामतेलाचा वापर विविध पदार्थ तळण्यासाठी करतात. पामतेलाचा दर १५० ते १५५ होता, तो आता खाली येऊन १२८ प्रतिकिलो आहे.

तेलाच्या दरवाढची अनेक कारणे आहेत. त्यात शासनाने इंर्पोट ड्यूटीत सोबत इतर करांमध्ये झालेली वाढ, शेंगदाणा, सोयाबीनला योग्य भाव न मिळणे, कमी पावसामुळे सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीनचे उत्पादन कमी होणे आदी कारणांचा समावेश असल्याचे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *