शनिवारी करा हे उपाय ; शारीरिक आणि मानसिक समस्या सुटतील

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जुलै । भगवान शनि यांना कर्मफळ देणारे असेही म्हणतात. मान्यता आहे की, एखाद्या व्यक्तीच्या कर्मांनुसार भगवान शनि त्यांना फळ देतात. जर कुंडलीत शनि एखाद्या शुभ स्थानावर बसला असेल तर ते एखाद्या व्यक्तीला रंक ते राजा बनवू शकतात. तुम्हालाही शनिचे अशुभ परिणाम भोगावे लागत असतील तर हे उपाय करा (Do these upay on Saturday to get rid from Shani ashubh parinam).

💠 शनि जर कुंडलीच्या पहिल्या घरात बसून अशुभ प्रभाव देत असेल तर शनिवारी दुधात थोडी साखर मिसळून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाच्या झाडाला अर्पण करावे. ओल्या मातीने कपाळावर टिळा लावावा.

💠 जर शनि दुसऱ्या घरात अशुभ परिणाम देत असेल तर शनिवारी आपल्या कपाळावर दुधाचा किंवा दहीचा टिळक लावावा. तसेच सापाला दूध द्यावे.

💠 तिसर्‍या घरात शनि बसून राहण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शनिवारी काळ्या तीळ, केळी आणि लिंबू दान करा. कुत्र्यांची सेवा करा आणि मांस आणि मद्यापासून दूर रहा.

💠 शनि चतुर्थ घरात बसले असल्यास होणारे अशुभ परिणाम टाळण्यासाठी शनिवारी म्हशी आणि कावळ्यांना नैवेद्य द्या. गरीब आणि गरजू लोकांना मदत करा. आपल्या क्षमतेनुसार त्यांना दान करा. वाहत्या पाण्यात मद्य प्रवाहित करा.

💠 पाचव्या घरात शनि बसलेले असताता होणारे अशुभ परिणाम टाळण्यासाठी आपल्या हातात लोखंडी अंगठी घाला आणि शनिवारी गरजूंना मूग दान करा.

💠 शनि जर सहाव्या घरातून अशुभ परिणाम देत असेल तर लेदर किंवा लोखंडी वस्तू खरेदी करा. शनिवारी पाण्यामध्ये काळी तीळ टाकून भगवान शंकराचा अभिषेक करावा.

💠 कुंडलीच्या सातव्या घरात बसलेल्या शनिचा अशुभ परिणाम टाळण्यासाठी शनिवारी बासरीमध्ये साखर भरुन किंवा मधयुक्त भांडे एखाद्या निर्जन ठिकाणी पुरून ठेवा.

💠 आठव्या घरात शनिचे दुष्परिणाम टाळण्यासाठी नेहमी आपल्याजवळ चांदीचे काहीतरी ठेवा. सापांना दूध द्या.

💠 जर कुंडलीच्या नवव्या घरात शनिचा अशुभ प्रभाव पडला असेल तर घराचे छप्पर स्वच्छ ठेवावे आणि छपरावर रद्दी, लाकूड इत्यादी वस्तू छतावर ठेवू नयेत ज्या पावसात ओल्या झाल्याने खराब होतील. त्याशिवाय, चांदीच्या चौरस तुकड्यावर हळद लावून आपल्याबरोबर ठेवावे. पिंपळाच्या झाडाला दररोज पाणी द्यावे.

💠 दहाव्या घरात शनि असल्यास मंदिरात केळी आणि चणा डाळ अर्पण करा. शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. गुरुवारी उपवास ठेवा आणि मांस, मद्यपान इत्यादीचे सेवन करु नका.

💠 कुंडलीच्या अकराव्या घरातील शनिचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी चांदीची वीट बनवा आणि ती आपल्या घरात ठेवा. शनिवारी शनिमंत्राचा 108 वेळा जप करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा.

💠 बाराव्या घरात शनिचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी गरजूंना क्षमतेनुसार काळ्या डाळी, काळी तीळ, काळे कपडे इत्यादी दान करा. मांस आणि मद्यपान चुकूनही करु नये.

टीप – कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *