व्यापाऱ्यांना पुणे महानगरपालिका दुकानात जाऊन लस देणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जुलै । आगामी काळात कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देण्याची योजना महानगरपालिकेने आखली आहे. महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्‍यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम गुरुवारपासून लसीच्या (Coronavirus Vaccine) उपलब्धतेनुसार राबविली जाईल, अशी माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. याशिवाय सध्या पुणे महानगरपालिकेकडून दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण सुरु असल्याचेही अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. (Covid vaccination drive for Pune Traders and shopkeeprs)

कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्यामुळे पुण्यातील जम्बो कोविड सेंटर अखेर बंद करण्यात आले आहे. जम्बोमधील रुग्ण कमी झाल्यानंतर 1 जून रोजी रुग्णालयातील 300 ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय 15 जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेमुळे 22 मार्चपासून जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत 22 मार्च ते 1 जुलै दरम्यान एकूण ३००९ रुग्ण जम्बोमध्ये दाखल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *