महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जुलै । गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा खोळंबा झाला आहे. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला दिमाखात आगमन केलेल्या पावसानं (Monsoon Rain) मागील वीस दिवसांपासून राज्यात दडी मारली आहे. दरम्यानच्या काळात राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. पण राज्यात अजूनही अपेक्षेप्रमाणे मान्सून सक्रिय झाला नाही.
3 Jul, Latest satellite obs at 2.30pm indicates clouds over south Konkan, Goa and Karnataka coast and N Kerala coast too.
Some cloud development obs over ghat sections too, and east of Vidarbha.
Mumbai Thane almost clear sky ⛅ pic.twitter.com/na8XLNsKlN— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 3, 2021
पावसाळ्याचा हंगाम सुरू असूनही मागील 10-12 दिवसात राज्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी राज्यातील शेतकऱ्यांना आणखी एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे. आज दक्षिण कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दाटून आले आहेत. या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात घाट परिसरात आणि पूर्व विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळणार आहेत.