Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलचे दर बेलगाम १ लीटरकरता मोजावे लागणार एवढे रुपये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । दररोज इंधन दरात दरवाढ होत असल्याने रेकॉर्ड ब्रेक किंमतीची उंची गाठली आहे. अनेक राज्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. तर काही राज्यात शंभरीचा आकार पार केला आहे. इंधन दरवाढीचा फटका सामान्यांना बसत आहे. तेल कंपन्यांनी आज 5 जुलै रोजी पेट्रोलच्या किंमतीत वाढ केली आहे. डिझेलचे दर स्थिर आहेत. रविवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या प्रती लीटरवर पोहोचले आहे. दिल्लीत पेट्रोल 99.86 रुपये प्रती लीटर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात तेजी वाढत आहे.

आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार वाढ
5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मे रोजीपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 4 मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 35 वेळा दरात वाढ झाली आहे. तर 33 वेळा डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

या शहरात 100 च्या पार आहे पेट्रोल-डिझेलचे दर
देशाच्या अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार गेलेत. मुंबई, चेन्‍न्‍ई, रत्‍नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बंसवाड़ा, इंदौर, जयपुर, भोपाळ, ग्‍वालियर, गुंटुर, ककिनाडा, चिकमंगलुर, शिवमोग्‍गा, पटना आणि लेह यांचा देखील समावेश आहे.

इंडियन ऑयलने ट्विटरद्वारे म्हटले आहे की, ‘आम्हाला ही घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे, सुमारे 30 हजार इंडियन ऑईल पेट्रोल पंप आता स्वयंचलित झाले आहे. आपल्या जवळच्या पेट्रोल पंपाला भेट द्या आणि ई-पावत्या, ऑटोमॅटिक लॉयल्टी पॉइंट्स आणि ऑटोमॅटिक पेमेन्ट मिळवा. ऑटोमॅटिक म्हणजे इंडियन ऑइल.’

महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर
मुंबई 105.24 पेट्रोल
ठाण्यात 105.23 रुपये पेट्रोल
वर्धा 105.76 रुपये पेट्रोल
वाशिम 105.95 रुपये पेट्रोल
यवतमाळ 106.37 रुपये पेट्रोल
अहमदनगर 105.42 रुपये पेट्रोल
अमरावती 105.38 रुपये पेट्रोल
औरंगाबाद 105.85 रुपये पेट्रोल
बीड 106.65 रुपये पेट्रोल
बुलढाणा 106.11 रुपये पेट्रोल
कोल्हापूर 106.05 रुपये पेट्रोल
नाशिक 106.21 रुपये पेट्रोल
उस्मानाबाद 106.03 रुपये पेट्रोल
पुणे 105.50 रुपये पेट्रोल
रत्नागिरी 106.65 रुपये पेट्रोल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *