महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । राज्यातल्या 18 हजार इंग्रजी शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (English medium school students) मेस्टा संघटनेकडून 25 टक्के शुल्ककपात (English medium school fee) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 18 हजार शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अखेर 25 टक्के शुल्ककपात केली. शाळांच्या मेस्टा या संस्थेने हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं मोफत शिक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अनेक पालकांनी शुल्क न भरल्याने शाळा चालवणे अवघड झाले आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने 15 टक्के फी करण्याचं सूचित केले होते. त्यामुळे मेस्टाने हा निर्णय घेतला आहे. या लाभ राज्यातल्या 18 हजार शाळांतील विद्यार्थ्यांना होणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) या संघटनेने इंग्रजी शाळांच्या शुल्कामध्ये 25 टक्के कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचाही निर्णय या संघटनेने जाहीर केला आहे. राज्यातील एकूण इंग्रजी शाळांपैकी 80 टक्के शाळा या संघटनेशी संलग्न आहेत. या शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. मुंबई, रायगड आणि ठाणे विभागात या संघटनेशी संबंधित 1200 इंग्रजी शाळा आहेत.