दोन दिवसांच्या अधिवेशनात राज्याचे प्रश्न सुटणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । कोरोना Corona संकटामुळे राज्य सरकारने दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचे conventionआयोजन केले आहे. आजपासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता विधानसभेच्या कामकाजाला तर १२ वाजता विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाला हजर राहणाऱ्या सर्व आमदारांना आरटीपीसीआर चाचणी RTPCR Test बंधनकारक करण्यात आली आहे. असे असले तरी दोन दिवसीय अधिवेशनात सरकारला घेरण्याचा विरोधकांनी तयारी केली आहे. आरक्षण, कोरोनावरील उपाययोजना, MPSC परीक्षाआणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.

मुंबईत Mumbai आज पासून विधानसभेचे बिगुल वाजणार असून विरोधक सभागृहात विविध प्रश्नांवर आक्रमक असणार आहेत. अनेक संघटनांनी त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिल्याने विधानसभा परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणताही गैर प्रकार घडू नये. या अनुषंगाने विधानसभा परिसरातील मार्गांवर पोलीस त्याच बरोबर सीसीटीव्हीच्या जाळे उभारण्यात आलेले आहे. विधानसभेत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पोलीस तपासणी करूनच त्याला प्रवेश दिला जात आहे.

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन दोन दिवसाच आहे. आजपासून या अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. मात्र हे दोन्ही दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. शिवाय अधिवेशनाच्य पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद न घेतल्यामुळे विरोधक आक्रमक पावित्रा घेऊ शकतील. या अधिवेशनात विविध मुद्द्यावर विरोधकांचा आवाज रोखण्यात सरकार कितपत यशस्वी होते,विधेयक कसे मंजूर करून घेते हे पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *