नव्या दोन संघांचा होणार समावेश ; IPL च्या मेगा ऑक्शनची तारीख ठरली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये नव्या दोन संघांचा समावेश करण्यासाठी बीसीसीआयने एक ब्लू प्रिंट तयार केली आहे. या ब्लू प्रिंटमध्ये नव्या संघांव्यतिरिक्त रिटेशन, मेगा ऑक्शन, खेळाडूंचा पगार आणि माध्यम हक्कांसाठीच्या निविदांचा समावेश आहे. नव्या दोन संघांसाठीची निविदा ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात येईल. आणि ही प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये मेगा लिलावाचे आयोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय यावर्षी आयपीएलमध्ये दोन नवीन संघांची भरती करण्यासाठीची निविदा ऑगस्टमध्ये जाहीर करेल आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत नवीन संघांची घोषणा केली जाईल. कोलकातास्थित संजीव गोएंका ग्रुप, द अदानी ग्रुप, अरबिंदो फार्मा लिमिटेड आणि टोरेंट ग्रुपने नवीन संघ खरेदी करण्यात रस दाखवला आहे.

बीसीसीआय फ्रँचायझीची पर्स सॅलरी वाढविण्याची तयारी करत आहे. पर्स सॅलरी 85 कोटीवरुन 90 कोटी करण्यात येणार आहे. आणि पुढील तीन वर्ष म्हणजे 2024 हंगामापूर्वीपर्यंत ती 100 कोटीपर्यंत वाढविण्यात येईल. फ्रँचायझीला पर्स सॅलरीच्या किमान 75 टक्के खर्च करणे बंधनकारक असेल. यावर्षी डिसेंबरमध्ये मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे.

खेळाडूंना रिटेन करण्याच्या नियमातही बीसीसीआय काही बदल करण्याची शक्यता आहे. प्रत्येक संघाला चार खेळाडू ठेवता येतील. फ्रँचायझी 3 भारतीय आणि एक परदेशी खेळाडू किंवा दोन भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू राखू शकते. तीन खेळाडू राखल्यास फ्रँचायझीची पर्स सॅलरी 15 कोटी, 11 कोटी आणि 7 कोटी रुपयांनी कमी होईल. तर दोन खेळाडू कायम ठेवल्यास पर्स सॅलरीमधून 12.5 कोटी आणि 8.5 कोटी वजा केले जातील. जर फक्त एकच खेळाडू कायम ठेवला तर 12.5 कोटींची कपात होईल. यासह बीसीसीआय मोठ्या माध्यम हक्कांसाठीच्या लिलावाचीही तयारी करत आहे. त्यासाठीच्या निविदा जानेवारी 2022 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *