महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारीवर निर्बंध आल्याने आज योगिनी एकादशीला राज्यभरातील हजारो वारकर्यांनी येऊन विठुरायाच्या कळसाचे आणि नामदेव पायरीचे दर्शन घेत आषाढी यात्रेचा आनंद घेतला . आषाढी सोहळ्यासाठी 17 जुलै पासून 25 जुलै पर्यंत शासनाने परवानगी दिलेल्या भाविक शिवाय कोणालाही पंढरीत प्रवेश असणार नसून हा संपूर्ण कालावधीत पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावात संचारबंदी असणार आहे . यामुळे आषाढी सोहळ्याला सर्वसामान्य भाविकाला येत येत नसल्याने आज योगिनी एकादशीला भाविकांनी गर्दी केली आहे .
आजच्या योगिनी एकादशी नंतर 15 दिवसांनी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे . यामुळेच मराठवाडा , विदर्भ , कोकण या भागासह कर्नाटक , आंध्रप्रदेश , तामिळनाडू या भागातील हजारो भाविकांनी योगिनी एकादशीला दर्शनासाठी गर्दी केली आहे . 18 जुलै पासून 25 जुलै पर्यंत चंद्रभागेच्या स्नानाची करता येणार नसल्याने आज योगिनी एकादशीला चंद्रभागा वाळवंट वारकर्यांनी फुलून गेले होते . काही विठ्ठल भक्तांनी मंदिर परिसरात रांगोळ्यांच्या पायघड्या घालत देवाची सेवा केली . देवा दोन वर्षे आषाढी चुकली आता तरी या कोरोना संकटाचा नामशेष करून पुढील आषाढीला माऊली पालखी संगे पायी वारी करू दे असे साकडे वारकरी देवाला बंद मंदिराबाहेरून घालत होते.