Gold Silver Rate : सोन्या-चांदी दर , जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । सोमवारच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या दरात अगदीच किरकोळ बदल झाल्याचं दिसून येतंय. कालच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत केवळ 10 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,440 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,440 रुपये इतका आहे. चांदीच्या किंमतीने या आधीच सत्तर हजारी पार केली आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या किंमतीत 100 रुपयांची घसरण झाली असून आता एक किलो चांदीसाठी 70,300 रुपये मोजावे लागतील.

गेल्या आठवड्याचा विचार करता चांदीमध्ये मोठी चढ-उतार पहायला मिळाली आहे. 30 जून रोजी चांदीमध्ये 400 रुपयांची घट झाली होती. त्यानंतर 1 जुलैला 1100 रुपये, 3 जुलैला 700 रुपये तर काल, 5 जुलैला 1200 रुपयांनी चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *