HBD DHONI : आज महेंद्रसिंग धोनी चा वाढदिवस ; वाचा माही च्या काही रंजक गोष्टी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीचा आज वाढदिवस आहे. ७ जुलै १९८१ रोजी रांची येथे जन्मलेल्या माहीने आज आपल्या आयुष्याची ४० वर्षे पूर्ण केली आहेत. धोनीचा वाढदिवस जगभर साजरा केला जात आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्याच्याशी संबंधित रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

# महेंद्रसिंह धोनीचे पहिले प्रेम त्याची पत्नी साक्षी नसून देश आहे. धोनीने एका मुलाखतीत सांगितले होते, धोनी लेफ्टनंट कर्नल म्हणून भारतीय सैन्यात
दाखल झाला आहे. २०११मध्ये त्याला हे मानद पद देण्यात आले आहे.

# महेंद्रसिंह धोनी क्रिकेटमधून निवृत्त झाला असेल, पण आजही तो खूप श्रीमंत आहे. जानेवारी २०२१पर्यंत त्यांची एकूण मालमत्ता ८३० कोटी रुपये आहे.
धोनीने २०हून अधिक कंपन्यांच्या जाहिराती केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याचे मानधन १५ कोटी आहे. आयपीएलमधूनच १५० कोटींची कमाई करणारा
तो एकमेव क्रिकेटपटू आहे.

# क्रिकेटशिवाय धोनीने फुटबॉल आणि बॅडमिंटनमध्येही प्रभुत्व मिळवले आहे. शूटिंगमध्येही धोनी आश्चर्यकारक आहे. धोनी गोलकीपर होता आणि तो
जिल्हा पातळीपर्यंत हा खेळ खेळत आहे. यासह धोनीने नुकताच अमेरिकेतील गोल्फ स्पर्धेतही भाग घेतला होता.

# धोनीला जुनी गाणी ऐकण्याची आवड आहे. तो किशोर कुमारचा मोठा चाहता आहे. तो बर्‍याचदा मुकेश यांच्या ‘पल दो पल का शायर हूं’ हे गाणे गाताना
दिसला आहे.

# महेंद्रसिंह धोनीलाही कार आणि दुचाकी खूप आवडतात. धोनीचे गॅरेज सुपरबाईक्सने भरलेले आहे. महाविद्यालयीन काळात धोनी अ‍ॅम्बेसेडर चालवत होता,
यामाहाची आरडी ३५० ही त्याची पहिली बाईक होती. धोनीकडे हायाबुसाशिवाय हेलकॅट, निन्जा, हार्ले डेव्हिडसन या बाईक आहेत. धोनीकडे हमर, पोर्श ९११,
ऑडी, मर्सिडीज बेंझ, रेंज रोव्हर अशी वाहने आहेत.

# महेंद्रसिंह धोनीचे प्राण्यांवर खूप प्रेम आहे. धोनीकडे बरेच श्वान आहेत आणि आता त्याच्याकडे दोन घोडेही आहेत.प्रत्येक मोठी मालिका खेळण्यापूर्वी किंवा स्पर्धेपूर्वी धोनी देवडी माँला भेट देतो. रांचीपासून ६० किमी अंतरावर देवडी माँचे मंदिर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *