महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै ।
मेष
आज दिवस शुभ आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. आर्थिक लाभ झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. कुटुंबाला महत्व द्या. त्यांच्या मागण्या पूर्ण करा. व्यावसायिकांना दिवस चांगला .
वृषभ
आज दिवस चांगला आहे. स्वास्थ्य चांगले असल्याने सुख आणि आनंद अनुभवाल. हळुहळु सगळे ठीक होईल. तुमच्या चिकाटी, परिश्रम, अणि जिद्दीचे फळ मिळणार आहे. आर्थिक लाभ.
मिथुन
आज दिवस चांगला जाईल . संयमशील व विचारपूर्ण वर्तन आज तुम्हाला खूप अनिष्ट गोष्टीपासून वाचवील. आपल्या बोलाचालीतून गैरसमज पैदा होतील. आज असेच काहीसे वाटेल. सूर्य मदत करेल.
कर्क
आजचा आपला दिवस अतिशय चांगला जाईल . अचानक धनप्राप्ती,मिळकतीत वाढ होईल. नवीन हवे हवेसे वाटणारे परिचय होतील. आरोग्य ठीक राहील. आज आपण काही सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाल.
सिंह
आज दिवस शुभ आहे. तुमच्या कामात उशीरा यश मिळेल. ऑफिस किंवा घरात जबाबदार्यांचे ओझे वाढेल. जी भरपूर काम, फोन, भेटी गाठी, महत्त्वाचा निर्णय असा हा दिवस आहे. अचानक नवीन काम मिळण्याची शक्यता आहे.
कन्या
आज दिवस बरा आहे. . संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. ऑफिसात वरिष्ठांबरोबर आपला वाद होईल.दिवस काही विशेष काम उरकून टाकण्याचा आहे. फार विचार करणे, चिकित्सा करणे हा तुमचा स्वभावधर्म असतो. पण त्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल.
तुला
आज दिवस मध्यम आहे.स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. अष्टमात असलेले चंद्र राहू आजही मानसिक ताण,शरीर कष्ट दर्शवतात. कार्य क्षेत्रात काही नवीन संधी मिळतील. मिथुन राशीतील सूर्य, भाग्य उत्तम राहील. तब्येतीची काळजी घ्या .
वृश्चिक
आज दिवस चांगला आहे . नोकरी धंदा आणि व्यवसाय क्षेत्र यातून आज आपल्याला भरपूर लाभ होणार आहे. सामाजिक जबाबदाऱ्या घेणे तुम्हाला आवडते. पण त्यापासून मनस्ताप होऊ शकतो. कोणाशी शाब्दिक चकमक झाली तरी धैर्याने काम पुर्ण करा.
धनु
आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक आणि व्यापारिक नियोजन करण्यासाठी कार्ये यशस्वी होतील. दुखापत होण्यापासून जपा. शत्रू वर मात करू शकाल. बौद्धिक कामे आणि व्यवसायात आज नवी विचार प्रणाली अमलात आणाल.
मकर
आजचा आपला दिवस मिश्र फलदायी आहे. तुम्ही सर्व कामे विचारपूर्वक करता. आज मन थोडे द्विधा होणार आहे. विवेक बुद्धी जे सांगेल तोच निर्णय घ्या. मुलांची चिंता असेल तर त्याचे निरसन करून घ्या. विचारात परिवर्तनाची गरज आहे.
कुंभ
आज आर्थिक स्थिती ठीक राहील. शत्रू तुमच्या पुढे टिकणार नाहीत. प्रभाव शाली दिवस.नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग आणि क्रोध तुमच्या मनात जागा होईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील.
मीन
आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्यांना भागीदारीसाठी उत्तम वेळ आहे. पति-पत्नी मध्ये दाम्पत्यजीवनात निकटता येईल. मित्र, स्वजन यांच्या बरोबर भेटी होतील. चंद्र राहू योगाने थोडा मानसिक ताण जाणवत असेल तर घरा बाहेर पडा. गुरु उपासना सुरू ठेवणे योग्य राहील.