आठवी ते बारावीपर्यंतचे शाळा वर्ग सुरू करण्यासाठी नवीन जीआर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । राज्यात कोरोना मुक्त (corona free village) गावात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा, (school) वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने (scool education dept) आज नवीन जीआर (gr) जारी केला आहे. यामध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्या समितीच्या निर्णयानुसार शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी जे गाव महिनाभरापूर्वी कोरोना मुक्त झाले अशा गावात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा, वर्ग सुरू केले जाणार आहेत. (New gr in maharashtra for starting schools from eight to twelve)

दोन दिवसांपूर्वी शिक्षण विभागाकडून आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा, वर्ग सुरू करण्यासाठी एक जीआर जारी केला होता, मात्र त्यात काही त्रुटी असल्याचे सांगत तो मागे घेण्यात आला होता. आज नव्याने जारी करण्यात आलेल्या जीआर मध्ये पालकांच्या सोबत चर्चा करून निर्णय घेण्याऐवजी गावातील थेट सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या समितीत तलाठी, ग्रामसेवक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे सदस्य असणार आहेत. तर प्राथमिक आरोग्य केंद्र यातील वैद्यकीय अधिकारी ही निमंत्रित सदस्य म्हणून या समितीत असतील.

नवीन जीआर मध्ये देण्यात असलेल्या मार्गदर्शक सूचनामध्ये शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी गाव हे एक महिन्यापूर्वी कोविड मुक्त असले पाहिजे. तसेच ज्या गावात जास्त विद्यार्थी असतील, त्याशाळा दर दिवशी दोन सत्रांमध्ये भरवण्यात याव्यात, प्रत्येक वर्गाचा कालावधी हा तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये त्यामुळे प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुट्टी नसेल,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *