नोकरी विषयक ; यंदा TCS कंपनी करणार 40 हजारहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । देशातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर कंपनी टीसीएसने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांने म्हटलंय की, आर्थिक वर्ष 2021-22 च्या दरम्यान कॅम्पसमधून 40,000 हून अधिक फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली जाणार आहे. टीसीएसचे global human resources चे प्रमुख मिलिंद लक्कड यांनी म्हटलंय की, पाच लाखहून अधिक कर्मचारी असणारी टीसीएस ही एक खासगी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. कंपनीने गेल्या वर्षी कॅम्पसमधून 40 हजार पदवीधरांना भरती केलं होतं आणि यावर्षी देखील ही संख्या मोठी असणार आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, कोरोना महासंकटामुळे भरती करण्यामध्ये कसल्याही प्रकारच्या अडचणी आलेल्या नाहीयेत. गेल्या वर्षी एकूण 3.60 लाख नवोदीत विद्यार्थी एका प्रवेश परीक्षेमध्ये व्हर्च्यूअल पद्धतीने सामील झाले. लक्कड यांनी पत्रकारांशी बोलताना पुढे म्हटलंय की, भारतामध्ये कॅम्पसमधून गेल्यावर्षी 40 हजार लोकांची नियुक्ती करण्यात आली होती. आम्ही यावर्षी देखील 40 हजारहून अधिक लोकांची नियुक्ती करणार आहोत.

तसेच यावर्षीची भरती ही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मोठी आणि गतीमान असणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. गेल्या वर्षी अमेरिकन कॅम्पसमधून भरती केल्या गेलेल्या 2 हजार इंटर्न्सपेक्षा ही अधिकांची नियुक्ती केली जाईल असे त्यांनी सांगितले, परंतु त्यांनी अचूक संख्या सांगितली नाही. कंपनीचे chief operating officer एन गणपती सुब्रमण्यम यांनी म्हटलंय की, भारतामध्ये टॅलेन्टची अजिबात कमतरता नाहीये. याउलट भारतात अत्यंत प्रतिभावान कर्मचारी उपलब्ध होतात, असं त्यांनी म्हटलंय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *