टूरिस्ट हॉटस्पॉटमध्ये व्हायरस वेगाने पसरण्याचा धोका; महाराष्ट्र-केरळात संक्रमण अनियंत्रित, देशातील 53% प्रकरणे येथेच

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांत कोरोना संसर्गाचे निम्म्याहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या राज्यात एकूण 53% प्रकरणे आढळली आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक (9,083) आणि केरळमध्ये (13,772) रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त सक्रिय प्रकरणे देखील येथेच आहेत.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की, 3 जुलै रोजी महाराष्ट्रात 8,700 हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली. जे 6 जुलैला कमी होऊन 6,700 च्या जवळपास आले. दरम्यान यानंतर, दररोज यापेक्षा जास्त नवीन प्रकरणे आढळली. त्याच वेळी, 2 जुलै रोजी केरळमध्ये 12,800 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली, जी 6 जुलैला 8,300 च्या जवळ आली. यानंतर, दररोज यापेक्षा अधिक प्रकरणे आढळली.

80% नवीन प्रकरणे 90 जिल्ह्यांमध्ये आहेत
लव्ह अग्रवाल म्हणाले की कोरोनामधील नवीन प्रकरणांपैकी 80% प्रकरणे 90 जिल्ह्यांमध्ये आहेत. असे 66 जिल्हे आहेत जेथे 8 जुलैला पॉझिटिव्हिटी रेट 10% पेक्षा जास्त होता. ते म्हणाले की, दररोज नवीन प्रकरणांमध्ये घट होणे सुरू आहे. गेल्या एका आठवड्यात दररोज नवीन प्रकरणांमध्ये सरासरी 8% घट झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *