मुंबई-पुणे हायवेवरील कामशेत खिंडीत सेल्फीशौकिनांचा उच्छाद

Spread the love

रविवारी आलेल्या आखाडकरांची व पर्यटकांची घोर निराशा

मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत खिंडीत अपघात होण्याची दाट शक्यता

गणेश क्षिरसागर । लाईव्ह महाराष्ट्र 24 । कामशेत ।

आषाढी (आखाढ ) रविवारची आणि वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटकांनी लोणावळा खंडाळा आणि पवना धरण परिसरातील पर्यटनस्थळी गर्दी पहायला मिळत आहे. पर्यटकांच्या वाढत्या वाहनांच्या गदीर्ने लोणावळा शहरांतर्गत रस्त्यांवर तसेच जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील कामशेत खिंडीत होत असलेली वाहतूक कोंडी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पोलिसांनी भुशी डॅमकडे जाणारा मार्ग बंद केला. यामुळे रविवारी आलेल्या आखाडकरांची व पर्यटकांची घोर निराशा झाली. म्हणून की काय या पर्यटनशौकिनांनी चक्क कामशेत खिंडीत रस्त्यावरच गाड्या उभ्या करून सेल्फी काढण्याचा मनमुराद आनंद लुटला… मात्र पर्यटकांच्या याच उत्साहाच्या उन्मादामुळे मुंबई-पुणे महामार्गावर अपघात होण्याची शक्यताही या खिंडीत नाकारता येत नाही.


पर्यटन, वर्षाविहाराच्या आनंदाबरोबर आखाड पाटीर्ची मौजमजा लुटण्यासाठी लोणावळा, खंडाळा व पवना धरण परिसरात रविवारी पर्यटकांचा जनसागर लोटला होता. शनिवार व रविवार या सुट्यांच्या दिवशी विशेषत: पावसाळ्यात पर्यटन व वर्षाविहारासाठी दरवषीर् लाखो पर्यटक येतात. या वर्षी अनपेक्षितरित्या पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशीडॅमकडे जाण्याचा मार्ग बंद आहे. त्यामुळे त्याठिकाणी भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना मुरड घालावी लागत आहे. रविवार असल्याने त्याचे औचित्य साधत अनेकांनी वर्षा विहाराबरोबर आखाड पाटीर्चा बेत रचला. त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळत होती.

वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पोलिसांची पुरेशी कुमक असूनही नियोजनाअभावी व पर्यटकांच्या बेशिस्तपणामुळे पोलिस यंत्रणेला वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यात डोकेदुखी ठरत असल्यामुळे भूषी डॅम व पनवा धरणाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आला. यामुळे रविवारी आलेल्या पर्यटकांची घोर निराशा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *